मानेवर तलवारी ठेवल्या तरी वंदे मातरम म्हणणार नाही!

मुंबई | मानेवर तलवारी ठेवल्या तरी वंदे मातरम म्हणणार नाही, असं सपाचे नेते अबू आझमी यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे देश सोडावा लागला तरी वंदे मातरम म्हणणार नाही, असं एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी म्हटलंय. 

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वंदे मातरमवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंय. विधासभेत सपा आणि एमआयएमच्या आमदारांनी या निर्णयाला विरोध केला.

दरम्यान, जे वंदे मातरम म्हणणार नाहीत त्यांच्या मनात पाकिस्तान आहे, त्यांनी देश सोडून जावं, असा पवित्रा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या