लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 30 जणांचा मृत्यू

अहमदाबाद | गुजरातच्या भावनगरमध्ये ट्रकला झालेल्या भीषण अपघातात 30 जणांना मृत्यू झालाय. अनेकजण जखमी असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

70 वऱ्हाडींना घेऊन हा ट्रक लग्नासाठी निघाला होता. मात्र चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक नाल्यात कोसळला. भावनगर-राजकोट महामार्गावर रनघोलाजवळ ही दुर्घटना घडली. 

मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या मोठी असल्याचं कळतंय. तसेच अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.