Top News मनोरंजन

…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट!

हैद्राबाद | असं म्हणतात, ख्रिसमसमध्ये अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात. इतरांचं माहिती नाही मात्र हैद्राबादमधील एका फूड स्टॉलच्या मालकाची इच्छा पूर्ण झाली असून त्याला मोठं गिफ्टही मिळालं आहे.

कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या अभिनेता सोनू सूदने हे मोठे गिफ्ट फूट स्टॉलच्या मालकाला दिलंय. हा फूडचा मालक सोनूचा फॅन होता. या फॅनच्या स्टॉलवर जाऊन सोनूने त्याला सरप्राईज दिलंय.

शुक्रवारी सोनू सूद हैद्राबादमध्ये त्याच्या फॅनच्या फूड स्टॉलवर पोहोचला आणि त्याला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या फूड स्टॉलवर सोनूने फ्राइड राइस स्वतःच्या हाताने बनवला आणि तो खाल्लाही.

या स्टॉलच्या मालकाने त्याच्या स्टॉलचं नाव सोनू सूदच्या नावावरून ‘लक्ष्मी सोनू सूद फास्ट फूड सेंटर’ असं ठेवलंय. आपल्या स्टॉलवर सोनू आल्याचं पाहून मालक त्याच्या पायाही पडला.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!

विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!

लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!

रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या