मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार मागे घेण्यात आली आहे. यावर भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मावर आयपीसी 192 नुसार मुंबई पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
त्यात त्या म्हणाल्या की, ‘खरं तर धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप या रेणू शर्माने लावला ही आमच्यासाठी एक धक्कादायक बाब होती. तसेच आज ही तक्रार मागे घेतली गेली, ते देखील आमच्यासाठी धक्कादायक आहे.’
तसंच, पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट होती. की हे प्रकरण आमच्यासाठी धनंजय मुंडे आणि रेणू शर्मापर्यंत सीमित नव्हतं. या माध्यमातून एक चुकीचा पायंडा आम्ही महाराष्ट्रात पडू देणार नाही. त्यामुळं आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
धनंजय मुंडे पर झुठे आरोप लगानेवाले रेणू शर्मा पर IPC 192 के तहत मुंबई पुलिस तुरंत कारवाई करे ।
इस घटनासे जिन पिडीताओंका शोषण हुवा है या हो रहा है समाज का उनकी तरफ देखनेका नजरीया गलत ना हो जाए इसलिए रेणू शर्मा जैसे झुठे आरोप करनेवाली महिला केउपर कारवाई होना जरूरी है @MumbaiPolice pic.twitter.com/R7vI84cSKp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 22, 2021
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार
“बलात्काराची तक्रार मागे, तरीही ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करा”
बलात्काराच्या तक्रारीसंदर्भात धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा दिलासा
“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!