बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची माहिती व्हाॅट्सअ‌ॅपवर टाकत असाल तर सावधान, तुमच्यावर होऊ शकते कारवाई

पुणे | सोशल मीडियावर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणीही अफवा पसरवत असल्याचं निदर्शनास आलं तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावं उघड झाल्यास विनाकारण अशा रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो, असं मत डॉ. म्हैसेकरांनी व्यक्त केलं आहे.

नागरिकांनी सामाजिक भान ठेवणं आवश्यक आहे. कोरोना संशयित किंवा रुग्णांची नावे उघड करता कामा नयेत, असं आम्ही पहिल्या दिवसापासून आवाहन करत आहोत. पण सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असंही म्हैसेकरांनी सांगितलं.

दरम्यान, पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला काळजीसोबतच मनस्तापालाही सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाचं नाव पुढं करून राज्य सरकार लोकांना घाबरवत आहे- राज ठाकरे

“महाविकास आघाडी अभेद्य, उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या वऱ्हाडी मंडळींनी लक्षात ठेवावं”

महत्वाच्या बातम्या-

…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!

खबरदार! कोरोनाबद्दल अफवा पसरवाल तर…

ऑपरेशन सांगुन होत नाही, महाराष्ट्रातही लवकरच ऑपरेशन लोटस होईल- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More