बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता आमीर खानलाही कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत झाला कार्यक्रम

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमिर खानच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भातील बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता आमिर खान कोरोनाबाधित झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. कोरोना झाल्यानंतर आमिर खानने घरीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. त्याचबरोबर आमिर खानची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन आमीरने केलं आहे.

सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिला टप्प्यातील गौरव सोहळा दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोना झालेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या कार्यक्रमात समृद्ध गाव योजनेत पात्र ठरलेले नागरिक आणि इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित असल्याने या कार्यक्रमातील अनेक लोकांना कोरोनाचा धोका असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमातील उपस्थितांना क्वारंटाईन व्हावं लागू शकतं.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More