बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

हैदराबाद | अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ता अपघातात जखमी झाला. साई धरम तेजला बेशुद्ध अवस्थेत मेडिकओव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटाजवळ जखमा झाल्या, पण तो आता धोक्याबाहेर आहे.

साई धरम तेज त्याच्या 18 लाखांच्या 1160 सीसी स्पोर्ट्स बाईकवर रायदुर्गम केबल पुलावरून आयकियाकडे जात होता, तेव्हा अचानक घसरुन खाली पडल्यानं जखमी झाला.

मेडिकोव्हर रुग्णालयात उपचार केल्यानंतर साई धरम तेजला अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मतानुसार तो धोक्याबाहेर आहे, त्याला डोके, पाठीचा कणा यासारख्या अवयवांना कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही.

दरम्यान, साई धरम तेज यांच्या दुचाकी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघातावेळी साई धरमतेज खूप वेगाने दुचाकी चालवत नव्हता, परंतु अचानक तोल सुटल्याने त्याची दुचाकी घसरली आणि तो खाली पडल्याचं दिसतंय. साई धरम तेज यानं स्पोर्ट्स बाईकवरुन जाताना चांगलं हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे त्याच्या डोक्याला कोणतीही इजा झाली नाही.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

‘…तर कोरोना पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, आम्ही आणखी उजळ माथ्याने समोर येऊ – छगन भुजबळ

गणपती बाप्पांचा पायगुण अन् या 8 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण नाही

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More