बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; ‘या’ दिग्दर्शकाला करतेय डेट

मुंबई | मराठी कलाविश्वातील सध्या आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे सर्वांचीच लाडकी आहे. सोशल मीडियावर देखील ह्रताचे अनेक चाहते आहेत. तिचं काम असो कींवा फोटोज, ह्रता अनेकवेळा चर्चेचा विषय ठरते. फुलपाखरू सिरीयल पासून घराघरात पोहोचलेली ह्रता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी चर्चेत येण्याचं कारण थोडं खास आहे.

अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी हृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे. हृताने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला पण अनेक तरूणांचं मात्र ह्रदय तुटलं आहे.

हृता दुर्गुळे टीव्ही दिगदर्शक प्रतीक शाह याला डेट करत आहे. हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून तिचा आणि प्रतिक शाह यांचा फोटो शेअर केला आहे. हृताने फोटो शेअर करताच कलाकार ते चाहते सर्वांनीच तिच्या आणि प्रतीकच्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरूवात केली. प्रतीकने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

प्रतीक शाह याने बेहद 2, तेरी मेरी एक जिंदडी, कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दिवाना था, मनमोहिनी, बहू बेगम या सारख्या हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर हृताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘फुलपाखरू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर हृता तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली. सध्या हृता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

 

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”

“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More