पुणे महाराष्ट्र

…म्हणून आढळरावांचे पीए खासदार अमोल कोल्हेंच्या दरबारी!

पुणे | शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे पीए प्रबोध सावंत यांनी खासदार अमोल कोल्हे यांची ऑफर स्वीकारली आहे. कोल्हेंच्या पीए पदाची जबाबादारी स्वीकारण्याबाबत सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी अजूनही एक कट्टर शिवसैनिक आहे. मी पुण्यातील शिवसेनेच्या आमदारांकडे जाण्याची तयारी केली होती. पण पक्षाला यश मिळालं नाही. सध्या महाविकास आघाडी झाली आहे. म्हणून  मी ही ऑफर स्वीकारली असल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे.

मी माझा प्रामाणिकपणा एवढे वर्ष जपलाय आणि तो शेवटपर्यंत जपणार आहे. मी आता साठीला आल्याने  फार वर्ष काम करेन असं सांगता येत नाही, असंही सावंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सावंत तिकडे का गेले, कोणी मध्यस्थी केली, तिकडे काय काम करणार, कसं करणार हे काही दिवसांनी आपल्या सर्वांना कळेलच. राजकारण फक्त राष्ट्रवादीलाच समजतं असं कोण म्हणतं?, असं वक्तव्य शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख रवींद्र करंजखिले यांनी केलं आहे.

 ठळक बातम्या-

सगळीकडून टीका होतेय म्हणून भाजप ‘जाणता राजा’चा मुद्दा उकरत आहेत- रुपाली ठोंबरे पाटील

राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने लढवली ‘ही’ नवी शक्कल!

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या