आदित्य ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई | विधानपरिषद निवडणूकीनंतर नाराज झालेले एकनाथ शिंदे आता नवीन गट तयार करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात येत आहे. यातच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून मंत्रीपदाचा उल्लेख काढला आहे.
सध्या सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीच्या एका हॅाटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा होणार आहे.
आता एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या 50 आमदारांची सख्या वाढताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांना रसद पुरवल्याचा आरोप करत विधानपरिषदेतून निवृत्त करण्यात आलेले रामदास कदमांना संधी दिली नाही. त्यांचा मुलगा योगेश कदम ही एकनाथ शिंदेच्या गटाला जाऊन मिळाले आहेत.
सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडचे आमदार वाढत आहेत. यातच संजय राऊतांनीही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं ट्विट केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.
थोडक्यात बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ
“शिवसेनाच नाही तर ‘या’ पक्षाचे आमदारही संपर्कात”; बच्चू कडूंच्या खुलाशाने खळबळ
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
शिवसेनेवर प्रहार!, एकनाथ शिंदेंच्या बंडाला बच्चू कडूंची देखील साथ
“आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही, आमचा गट हीच खरी शिवसेना”
Comments are closed.