बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डान्स’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महेश लांडगेंनी आळंदीत लावलं लेकीचं लग्न!

पुणे | आमदार महेश लांडगे यांचा मुलीच्या मांडव डहाळा कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. तसेच त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर लग्नाची नियोजित तारीख लांब असतानाच आळंदीत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत आज साधेपणाने महेश लांडगेंनी लेकीचा विवाह सोहळा केला. मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पन्नास जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी आणि रावेत येथील नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद यांचा विवाह येत्या सहा जूनला करण्याचे नियोजन केलं होतं. त्यानिमित्ताने रविवारी भोसरी गावातील लांडगे आळीमध्ये रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास निमित्ताने मांडव डहाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्या साक्षी हिची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती.

हा विवाह सोहळा 6 जून राजस्थान किंवा गोवा येथे होणार होता. मात्र लॉकडाउन वाढवल्याने सोमवारी सकाळीच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर दर्शन घेऊन घरातील लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.

थोडक्यात बातम्या-

संभाजीराजेंंनी केलेल्या हेरगिरीच्या आरोपावर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण!

ब्लॅक फंगसवर ‘हा’ 100 वर्षे जुना फॉर्म्युला ठरतोय प्रभावी; डॉक्टरचा दावा

कोरोनावर रामबाण औषध देणाऱ्या बाबाचा कोरोनानेच मृत्यू

‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली पण…’; निलेश लंकेंच्या नोटीसला मनसेचं आव्हान

प्रियकराने खेळला खुनी डाव! प्रेयसी माहेरी येत असताना धक्कादायक प्रकारे केला कहानीचा शेवट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More