बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर अखेर हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. सध्या तो त्याच्या पत्नीनं केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. अशातच आता या प्रकरणात हनी सिंगनं मौन सोडलं आहे.

हनी सिंगनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं पत्नीनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हनी सिंगची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हनी सिंगनं पोस्टमध्ये म्हटलं की, शालिनी आणि मी गेल्या 20 वर्षापासून पती पत्नी आहोत. मात्र आता शालिनीनं केलेले हे आरोप खोटे असून या आरोपांमुळे मला दुःख झालं आहे. इथून मागे मी अनेक गोष्टींचा सामना केला मात्र मी कधीही प्रेस नोट जारी केली नाही.

पुढे हनी सिंगनं म्हटलं की, यावेळी माझ्या आई-वडिलांवर आणि बहिणीवरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी शांत बसून काही होणार नाही. ज्यांनी माझ्या वाईट काळात मला साथ दिली त्यांच्यावर आरोप केले गेले असून हे आरोप बदनाम करणारे आहेत. या आरोपावंर उत्तर देण्यासाठी मला न्यायालयानं संधी दिली आहे. त्यामुळे न्यायालय जोपर्यंत दोन्ही बाजू एकूण निर्णय घेत नाही, तोपर्यंत कृपया कोणीही माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबवर चुकीचे आरोप करु नका.

दरम्यान, मी 15 वर्षाच्या करिअरमध्ये अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. माझ्या टीमलाही माझे आणि माझ्या पत्नीचं नातं कसं आहे माहित आहे. याशिवाय माझ्या प्रत्येक मीटिंगला, कार्यक्रमाला आणि चित्रिकरणालाही माझी पत्नी माझ्या समवेतच असते. देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल. त्यामुळे मी आता याविषयावर काही बोलणार नाहीये, असं त्याने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या –

कोरोना काळात गरजूंसाठी ‘मसीहा’ ठरलेला सोनू सूद पूरग्रस्तांच्याही मदतीला धावला!

इरफान पठाणचा मोदींना टोला म्हणाला, ‘भविष्यात आशा आहे की…’

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”

“फडणवीस आठवड्यातून दोनदा दिल्ली दरबारी मुजरे करायला जातात”

चिंताजनक! कोरोनामुक्त रुग्णाच्या मेंदुत आढळला ‘हा’ फंगस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More