बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीनंतर काँग्रेसचे थेट ‘ईडी’ला प्रश्न

मुंबई | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तीन वेळा समन्स बजावल्यानंतरही त्यांनी चौकशीला येण्यास टाळाटाळ केल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेची आताची बाजारातील किंमत ही 350 कोटींपेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित प्रकरणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

ईडीने जप्त केलेली मालमत्ता व फ्लॅट हे जर 2004 साली खरेदी केले गेले असतील, तर त्याचा या प्रकरणात नेमका काय संबंध असू शकतो?, सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी दिल्याची माहिती जर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांना होती, तर त्यांनी तेव्हाच कारवाई न केल्याबद्दल परमबीर यांची चौकशी ईडी कडून का होत नाही?, तसेच ज्या बार मालकांनी वाझेला पैसे दिले आणि ते पैसे वाझेने अनिल देशमुख यांना दिले असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या बार मालकांवर अजून कारवाई का करण्यात आलेली नाही?

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ईडीला वरीलप्रमाणे प्रश्न विचारून केंद्र सरकार विरोधी पक्षांचा छळ करून त्यांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचा वापर करत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More