नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. अशात नोएडाच्या जलालपूर गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी अतार सिंह यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह याचं निधन झालं. त्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतर सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झालं होतं. दोन्ही मुलांच्या निधनाने अतर सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता अतर सिंह यांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर अतर सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अतर सिंह यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अतर सिंह यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. देशात अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रातलं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना
नियम मोडणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी शिकवला धडा, पहा काय घडलं..!
कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती
शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.