बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…

कोल्हापूर | राज्यात एकिकडे कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतंच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलनाची हाक दिलेली असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. भेटीनंतर शाहू महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याविषयी माहीती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, आजच्या भेटीदरम्यान सर्वच महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली आहे. यासंदर्भात अजित पवार स्वत: माहिती देतील. यावेळी आम्ही हेच मार्गदर्शन केलं की मराठा समाजासाठी सरकारला जेवढं काही करणं शक्य आहे ते त्यांनी करावं. अजित पवारांनी देखील हे मान्य केलं आहे.

पुढे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणावर दिलेला निकाल पुन्हा एकदा अभ्यासला गेला पाहिजे. समजून घेतला पाहिजे आणि मराठा समाजासाठी जे काही करणं शक्य आहे, ते सगळं केलं पाहिजे.

दरम्यान, अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे ही भेट सर्वांचं लक्ष वेधणारी ठरली आहे.

थोडक्यात बातम्या – 

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु!

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More