बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुंबई | अभिनेत्री कतरिना कैफने (Actress Katrina Kaif) नुकताच तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस तीने पती विकी कौशल, मेव्हणा सनी कौशल, सरवरी वाघ, कबीर खान आणि मिनी माथूर यांच्यासोबत साजरा केला आहे. तिने तिच्या गँगसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे बोलले जात आहे.

विकी कौशलने आपल्या प्रिय पत्नीसाठी एक लहान, साधी पण हृदयस्पर्शी पोस्ट केली आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) त्यानं लिहलं आहे.“बार बार दिन ये आये… बार बार दिल ये गाये. माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासोबत त्याने समुद्राजवळील कतरिनाचा, एक मोठा पांढरा शर्ट घातलेला आणि हसत असलेला फोटो शेअर केला आहे.

यानंतर मात्र चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकलेले  दिसत आहेत. विकीने एवढ्या वेळाने तिला शुभेच्छा दिल्यानं कमेंट सेक्शनमध्ये त्यांची खरडपट्टी काढली आहे. लग्नानंतर बायकोचा पहिला वाढदिवस आणि तु संध्याकाळी शुभेच्छा देतोस. तिच्या वाढदिवसाच्या आधी दुसऱ्या लोकांना पहिले शुभेच्छा देतोस? हे बरोबर नाही, अशा शब्दात एकाने सुनावलं आहे. इतक्या वेळाने विश केलं मॅम चिडणार नाही का? असा प्रश्नही एकाने विचारला आहे.

दरम्यान, ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटात कतरिना दिसणार आहे. तर कतरीना लवकरच सलमान खानसोबत टायगर-3 मध्ये देखील झळकणार आहे. तर दुसरीकडे अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीसोबत ‘गोविंद नाम मेरा’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

थोडक्यात बातम्या

मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ

भाजपच्या मध्यस्तीमुळे शिंदे-ठाकरेंची भेट होणार?, शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड त्यामुळे…’, स्नेह भोजनात आमदारांना सूचना

‘…अन् त्यानंतर मी एकदाही उद्धव ठाकरेंशी बोललो नाही’, उदय सामंत स्पष्टच बोलले

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More