Top News देश

कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ |  केंद्र सरकारने नविन केलेले कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने अजूनही यावर काहीच तोडगा काढला नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याचे समर्थन केलं आहे.

तिन्ही कृषी सुधारणा कायदे रातोरात आणले गेलेले नाहीत, मागील 20-22 वर्षांत प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केली आहे, तसेच कमी-अधिक प्रमाणात सर्वच संघटनांनी यावर विचारविमर्श केला असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कृषी मालाची ‘किमान आधारभूत किंमत’ (एमएसपी) कायम ठेवली जाईल, तसेच शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान सरकार होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.

‘आम्ही शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ समजतो. आम्ही शेतकऱ्यांचे कदापि नुकसान होऊ देणार नाही’, असं भावनिक आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं. तसेच मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की, या नव्या कायद्याचे सगळे श्रेय तुम्ही घ्या. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची असल्याचंही मोदींनी म्हटल आहे.

थोडक्यात बातम्या-

CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी

सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

“गोपीचंद पडळकरांना अजून अजित पवार कळले नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या