बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लागेल ती मदत मागा परंतू पुण्याची वाढती रूग्णसंख्या थांबवा; अजित पवारांची प्रशासनाला सूचना

पुणे | पुणे जिल्‍ह्यातील कोरोना बाधित रुग्‍णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनातील झुंबर हॉलमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त व अन्य विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढत्या रूग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत अथून पुढे लागेल ती मदत मागा मात्र पुण्याची रूग्णसंख्या नियंत्रणात आणा, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मेपर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना अजित पवार यांनी दिल्‍या. आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्‍वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी, त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग या सर्वांनी समन्‍वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यासोबतच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्‍हा प्रशासनावर येणार आहे. यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय राखून नियोजनबध्‍द काम करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या.

कोरोना रोखण्‍याच्‍या कामाला गती यावी, यासाठी महसूल विभागातील वरिष्‍ठ अधिकारी डॉ. नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्‍यात आली आहे. परराज्‍यातील जे मजूर आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छित असतील, त्‍यांना रेल्‍वेनं पाठवण्‍याचं नियोजन करण्‍यात यावं. या मजुरांच्‍या प्रवासाचा खर्च राज्‍य शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) करण्‍यात येईल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून त्यापाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. पुणे शहरातील ज्‍या भागात कोरोना बाधित रुग्‍ण अधिक आहेत, तिथून कुणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर, ती सुद्धा मदत उपलब्‍ध करून दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे

स्थलांतरित कामगारांकडून प्रवासी भाडं आकारु नये- प्रकाश आंबेडकर

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

“आपल्याला कोरोना विषाणूशी जुळवून जगणं शिकलं पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More