बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

बारामती | आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं.

एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजितदादांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजितदादांना दिलं. माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली.

निवेदन पाहून अजित पवार चांगलेच भडकले. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात अजित पवारांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.

दरम्यान, बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. तसेच चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More