नागपूर महाराष्ट्र

शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार

नागपूर | बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये असा पिक विमा देण्यात आला आहे. त्यामुळे या शेतक-यांची थट्टा लावली आहे का?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपला विचारला आहे.

तुंबड्या भरायचं काम विमा कंपन्यांनी सुरु केलं आहे. विमा कंपन्यांनी स्वतःची चांदी करून घेत शेतक-यांची माती केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांपेक्षा रिलायंस कंपनीला पिक विमाचा फायदा झाला आहे. रिलायन्स कंपनीला 809 कोटींचा विमा मिळाला. त्या 809 कोटींपैकी शेतकऱ्यांना 105 कोटींची भरपाई दिली आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!

-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल

-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!

-आमची माणसं नेवून तुम्ही पोटं वाढवलीत- अजित पवार

-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या