सरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र

मुंबई | सरकार गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. 

सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालढकल करत आहे. मराठा आरक्षण देण्याची सरकारने केवळ घोषणा केली प्रत्यक्षात कृती मात्र केली नाही, असं त्यांनी म्हटलं. 

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मुंबईत असतात. एवढ्या दिवसांत ते आंदोलकांची भेट घेऊ शकले असते. आम्ही येणार म्हणून सहकार मंत्री सुभाष देशमुख भेटायला आले का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, मराठा समाजाच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानावर कार्यकर्त्यांचे उपोषण सुरु आहे. त्यातील एकाची प्रकृतील खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल