नरेंद्र मोदी एकटा जीव सदाशिव आणि आमचा झालाय पांडू हवालदार!

पुणे | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मिश्कील अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला. इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवारांनी मोदींवर जोरदार टीका केली. 

मोदीसाहेब तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. संसारी माणूसच तुम्हाला न्याय देऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले.

गॅस सिलेंडर वाढला की ‘बरा आला गिळायला’, पेट्रोल जास्त झालं की ‘बघा आज पैसे पुरले नाहीत, महिन्याने पैसे विसाव्या दिवशीच संपले’, असं घरी गेल्यावर ऐकावं लागतं. मोदींना कोणी बोलायला नाही. जायचं घरी आणि झोपायचं, असं अजित पवार म्हणाले. 

एकटा जीव सदाशिव असा दादा कोंडकेंचा चित्रपट होता, आमचा झालाय पांडू हवालदार, सोंगाड्या, असं देखील अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मी देशाचा पंतप्रधान होऊ शकतो- राहुल गांधी

-निवडणुका जिंकण्यासाठी भाजपची मोठी खेळी; ‘स्टार’ उमेदवार मैदानात

-मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणावरून भाजपच्या मंत्र्यांना झापलं

-धावांची शंभरी गाठायच्या आत विंडीजचा निम्मा संघ तंबूत!

-पुण्यात भिषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 8 जखमी