बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?’; अजित पवार संतापले

मुंबई | शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय?, असे सवाल अजित पवारांनी केले आहेत.

हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशाप्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत?, असं अजित पवार म्हणालेत.

शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान, कायदा, नियम सारखे. त्यापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा? अजून तर कुठे सुरुवात झालेली नाहीय आणि त्यांना एवढी मस्ती आलेली आहे, असं पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“शिंदे सरकार लोकशाही, संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं”

मोठी बातमी! महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका

“आजकाल घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात”

सहा महिन्यांपूर्वी केलेली राकेश झुनझुनवालांची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

विनायक मेटेंचा अपघात की घातपात?, ‘ही’ प्रश्न अनुत्तरीतच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More