मी हसण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पण हसा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

बारामती | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामतीतील बूथकमिटी कार्यकर्त्यांना हसण्याचा कामनंत्र दिला आहे. आगामी काळात निवडणूकांना सामोरे जाताना प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्याने हसून व उत्साहानेच मतदारांचे स्वागत करा, त्याने मतदारांनाही बरं वाटत, असं ते म्हणाले.

 हल्ली मीही हसण्याचा प्रयत्न करतो, हसूच येत नाही तो भाग वेगळा आणि हसण्यासारख वागाव म्हटल तर कार्यकर्त्यांना मला येड लागलय का काय अशी शंका येते, असंही ते म्हणालेय

दरम्यान, कार्यकर्त्यांनी फोटो देताना हसरे राहायला हवे, कपाळावर आठ्या पडलेला माणूस कोणालाच आवडत नाही त्या मुळे तुमचा चेहरा छान हसरा असेल तर मतदारांनाही ते बरे वाटेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारू!

-रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

-कॅन्सर समजताच मी घाबरलो होतो, मात्र ‘या’ लोकांनीच मला आत्मविश्वास दिला- शरद पवार

-बायकोला विधानसभेची उमेदवारी द्यायला मी अशोक चव्हाण आहे का?

-मनसे कायद्याचं पालन करत नाही, त्यांना महाआघाडीमध्ये घेणार नाही!