बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

मुंबई | भाजपला आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे, अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजपने आंदोलन करण्याचं काहीही कारण नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुरू झाली आहे. भाजपने घाई करू नये. आता सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. आम्ही असं काम करू की त्यांना आंदोलन करण्याची गरजच राहणार नाही, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलंय.

भाजपला पायरीवर बसून आंदोलन करताना बघून आम्हाला आमचे जुने दिवस आठवले. घोषणा देत असताना आमचेही घसे असेच कोरडे पडायचे. मग कुणी गोळी दे कुणी काय कर असं व्हायचं, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मनमिळावू आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली, 50 कोटी वाटून सत्ता मिळवली- रंजन तावरे

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचं कामकाज तहकूब

महत्वाच्या बातम्या- 

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

ह.भ.प. इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलनं केला ‘हा’ मोठा खुलासा

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More