पुणे महाराष्ट्र

पुण्यातील खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल ताब्यात घ्या- अजित पवार

पुणे | पुणे शहरातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

अजित पवारांनी आज पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थितीची माहिती घेण्यात आली.

केंद्र शासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल किंवा खासगी शैक्षणिक संस्थांची अथवा खासगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्टनुसार जिल्हाधिकारी यांना संबंधित इमारती अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या