Top News पुणे महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

पुणे |  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. या निवडणूकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही आमच्या स्वबळार निवडणूक लढवू, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणातात, ‘आम्ही निवडूण येणार’ पण मी म्हणतो ‘आम्ही खेचून घेणार’, असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. पुण्यात अजित पवारांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

विधानसभा अध्यक्षाबाबत पत्रकरांनी विचारलं असता, विधानसभा अध्यक्षांबाबत अधीच निर्णय झाला आहे. ते पद काँग्रेसकडे राहणार आहे. त्याबाबत काही बदल करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते घेतील, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ज्यांना पक्षात यायचं आहे त्यांचं वाजत गाजत स्वागत आहे. इलेक्टिव्ह मेरीट असणाऱ्यांचं पहिलं स्वागत करण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

“पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर…”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या