Top News देश

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

लखनऊ |  उत्तर प्रदेशचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबेचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.  मात्र या एन्काऊंटनंतर अनेक जण अनेक सवाल उपस्थित करत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आखिलेश यादव यांनी देखील या एन्काऊंटवर शंका उपस्थित करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रत्यक्षात ही कार उलटलेली नाहीये तर गुपीतं उघड होण्यापासून आणि सरकार पलटण्यापासून वाचलंय, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. ट्विट करत त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

विकास दुबेच्या अटकेनंतरही आखिलेश यादव यांनी सरकारला प्रश्न विचारले होते. ज्या प्रकारे विकास दुबेला अटक करण्यात आलं आहे त्यावरून हे आत्मसमर्पण होतं की अटक? हे सरकारने अगोदर स्पष्ट करावं, असं आखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.

लॉकडाऊन असताना राज्यासाठी मोस्ट वॉटेन्ड असलेला गुन्हेगार राज्यांच्या सीमा पार करून पोलिसांच्या डोळ्यात धूळ कशी काय फेकू शकतो. याच्यापाठीमागे कोण कोण आहे हे देखील समोर आलं पाहिजे, अशी मागणी आखिलेश यादव यांनी केली होती. मात्र आता एन्काऊंटरनंतर काही प्रश्नांची उत्तर ही कधीच मिळणार नाहीत.

ट्रेंडिंग बातम्या-

क्रूरतेचा हैवाण होता विकास दुबे; हत्येनंतर 5 मृतदेहांसोबत जे केलं ते ऐकून अंगावर काटा येईल!

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण; 4 पोलीस जखमी

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या