बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

मुंबई | मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई एटीएसने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गौर ला अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दीव-दमणहून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. ही गाडी तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. ही गाडी खून करण्यासाठी वापरण्यात आली की, नाही याची तपासणी सध्या चालू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीत सिंह यांनी दिली आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन हत्येसाठी वापरलेले 14 सिमकार्ड  नरेश गौरने गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सिमकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते, अशी माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर वाझे यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे यांनी आपल्यावर असलेले सगळे आरोप फेटाळून लावले. गाडी मी वापरत नव्हतो आणि मनसुख हिरेन यांना ओळखतही नव्हतो असं वाझे यांनी चौकशीत सांगितलं होतं. मात्र, वाझे खोटं बोलत आहे याचे पुरावे मिळाले आहे, असं जयजीत सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, 4 मार्चला सचिन वाझे यांनी कामानिमित्त हीच व्होल्वो कार घेतली होती. त्यावेळी विनायक शिंदेनी बनावट सिमकार्डद्वारे फोन करून तावडे नावानं मनसुख यांना बोलावून घेतलं आणि नंतर याच गाडीत त्यांची हत्या केल्याची शंका एटीएसला आहे.

थोडक्यात बातम्या

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका

खोकला झाला म्हणून डाॅक्टरांकडे गेल्यावर छातीत जे आढळलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More