बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इराणचा अमेरिकेसह मित्रराष्ट्रांना इशारा; आमच्या दिशेने एकही गोळी आली तर…

तेहरान | इराणच्या दिशेने एकही गोळी चालली तर अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकसानाला सामोरे जावं लागेल, असा सूचक इशारा पश्चिम-दक्षिण आशियायी सशस्त्र बलाच्या जनरल स्टाफचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबुलफजल शेकरची यांनी ‘तसनीम समाचार एजन्सी’शी बोलताना दिला.

हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचं इराणने स्पष्ट केलं होतं. मात्र, ड्रोन इराणच्या हद्दीत नसून आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होता, असा अमेरिकेचा दावा आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आसन्न हल्याबाबत इशारा इराणने फेटाळला आहे. इराणने खूप मोठी चूक केली आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-विधानसभेच्या अगोदर भाजप काढणार रथयात्रा; ‘फिर एक बार शिवशाही सरकार’

-विनोद तावडे म्हणतात, धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही…

-पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय; शेतकऱी प्रश्नावरून बच्चू कडू गरजले

-मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे

-या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More