Top News

“मी आजवर देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही”

Loading...

सांगली | मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं  आहे. अमित शहा सांगलीमध्ये पार पडलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अमित शहांनी  देवेंद्र फडणवीसांचं आणि त्यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री 12 वाजता देखील मला महाराष्ट्रातील विकासाच्या कामांसाठी फोन करतात. फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रचंड काम करतात. उद्योग, शेती, या सारख्या अनेक विषयांवर ते सतत चर्चा करतात, असंही अमित शहांनी यावेळी सांगितलं.

Loading...

रात्री जेव्हा 12 वाजता मला फोन येतो तेव्हाच मी समजतो की, हा फोन देवेंद्र फडणवीस यांचाच असणार.  फडणवीस हे सतत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात, असं सांगत शहांनी प्रचार सभेत फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली.

दरम्यान, तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. स्वत: पवार 10 वर्ष केंद्रात होते. मात्र महाराष्ट्राचा विकास झाला नाही, असं म्हणत अमित शहांनी जाहीर सभेत शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या