देश

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

नवी दिल्ली | आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांसाठी 18,000 कोटी रुपयांचा पुढील हप्ता जाहीर करतील. पंतप्रधान हे शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था कायम राहिलं, असं अमित शहा यांनी सांगितलं आहे.

कोणीही एमएसपी व्यवस्था किंवा शेतकऱ्यांची जमीन त्यांच्यापासून हिसकावून घेणार नाही. सरकार मनापासून शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे, असं अमित शहा म्हणाले.

दरम्यान, विरोधक शेतकऱ्यांची किमान आधारभूत किंमतीवरुन दिशाभूल करत आहेत. मी हे स्पष्ट करु इच्छितो की, किमान आधारभूत किंमत ही व्यवस्था कायम राहिल. तसेच तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असं अमित शहांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

जळगावात भाजपला धक्का; ‘या’ नेत्याने दिली भाजपला सोडचिठ्ठी

आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू- शोएब अख्तर

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

ब्रिटनहून परतलेली बेपत्ता कोरोनाबाधित महिला आंध्रात सापडली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या