पुणे महाराष्ट्र

आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

आत्मनिर्भर भारत म्हणून एनडीए सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात ‘पूंजीपती निर्भर भारत’ असल्याची टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सरकारी संपत्तीचे परिक्षण करण्याचा सरकारचा मनोदय चिंताजनक असून रेल्वे, बंदरे, पोस्ट यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या काही मोजक्या भांडवलदारांच्या ताब्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारी मिळकती विकून पैसा कमवणे अतिशय गंभीर आणि धोकादायक बाब असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय.

दरम्यान, केवळ तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केला असल्याचे दिसतंय, अशी टीका अमोल कोल्हेंनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

सरकारचा कंपन्यांना दिलासा; पीएफसंदर्भात निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

“निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजप निवडणूकीचा जाहीरनामा”

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित

अर्थमंत्र्यांकडून PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या