Top News महाराष्ट्र मुंबई

“70 दिवसांपासून मुग गिळून गप्प बसलेले आता तोंडं उघडायला लागलेत”

मुंबई |  रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्याची भारतीय सेलिब्रेटींमध्ये चढाओढ लागली होती. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तिखट भाष्य केलं आहे.

रिहाना 4400 कोटींची मालक असुन अमेरिकेची पॉप सिंगर आहे. तिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाणीव आहे, मात्र मागील 70 दिवसांपासून मुग गिळून गप्प बसलेले सेलिब्रिटी आता #Indiatogether”नावाखाली तोंडं उघडायला लागलीत, असं मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सचिनला क्रिकेटचा देव मानला त्या व्यक्तीने असा ट्रेंड जाहीर ट्विटरवर चालवुन शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. रिहाना तुझे अभिनंदन तर सचिन तेंडुलकर यांचा निषेधच, असं देखील मिटकरी यांनी म्हटलंय.

दरम्यान, सचिनसह अनेक क्रिकेटपटू तसेच सिने कलाकारांनी रेहानासह परदेशी कलाकार तसेच सेलिब्रेटींना खडे बोल सुनावले होते, मात्र या प्रकरणात त्यांनाही ट्रोल व्हावं लागलं आहे.

 

रिहाना 4400 कोटींची मालक असुन अमेरिकेची पॉप सिंगर आहे.तिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाणीव आहे मात्र मागील 70…

Posted by Amol Mitkari on Thursday, 4 February 2021

थोडक्यात बातम्या-

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक, म्हणाली…

  यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”

   नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!

    शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या