मुंबई | दिल्लीत झालेल्या घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शेलारांवर टीका केली आहे.
आशिष शेलार हे भाजप आणि संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करत असल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत याचे उत्तर शेलार यांनी दिलं नाही, असंही मिटकरी म्हणाले. याआधी शेलारांनी पवारांवर जोरदार टीका केली होती.
दरम्यान, कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही?, आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, असं आशिष शेलारांनी म्हटलं होतं.
आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही.@TV9Marathi@abpmajhatv
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 27, 2021
थोडक्यात बातम्या-
“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”
आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!
भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार
“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”
काँग्रेस सूडाच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे- सुधीर मुनगंटीवार