बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं होतं. आक्रमकपणे आपली बाजू मांडून सरकारला दोन पाऊलं मागे घ्यायला त्यांनी भाग पाडलं. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

एकीकडे नागपूरसारख्या शहरात कोरोना रूग्णसंख्या वाढत चालली आहे. या रूग्णांना भरती करण्यासाठी रूग्णालयात जागा शिल्लक नाही. अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तर दुसरीकडे आपल्या काही ‘पिट्ठुच्या’ साथीने उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसूली करण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

ट्विटमधून प्रथमच अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे चौकशी प्रकरणावर भाष्य केलं आहे. तर वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवर त्यांंनी या आधीही सरकारला प्रश्न विचारले होते. तर महिला दिनी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत महिलांच्या सुरक्षिततेवरून ठाकरे सरकारवर टीका केली होती.

दरम्यान, भाजप वाझे प्रकरणातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. चौकशी झाल्यावर वाझेंवर कारवाई करू, अशी भूमिका सरकारने घेतली असताना वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबतं सुरू झाली आहे? असा सवाल विरोधीपक्ष उपस्थित करताना दिसत आहे.

पाहा ट्विट –

 

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! शेतकऱ्यानं बनवली चक्क 300 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार

तरुणीचा ‘हा’ पॅराग्लायडिंग व्हिडिओ होतोय खुपचं व्हायरल; विनंती पाहुन हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More