Top News

फडणवीसांनी विरोधकांचे फोन ट‌ॅप केले?; अमृता फडणवीस म्हणतात…

पुणे | महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस सरकारवर आपले फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. यावर माजी मु्ख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी असून ते फक्त भाजप नको म्हणून एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. त्यामुळे ते अशा प्रकारचे खोटे आरोप करत असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाची चौकशी करत असतील तर चालेल. मागील सरकार फक्त भाजपचे नव्हते. त्यामध्ये शिवसेनाही होती. त्यामुळे या प्रकरणाची चैकशी झाली तरी चालले, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझा फोन काॅल्सचे टॅपिंग होत असल्याची माहिती माझ्या कानावर आली होती. मात्र आपण याला घाबरलो नसल्याचं, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या