बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केरळमध्ये तणावाचं वातावरण! ‘त्या’ गंभीर घटनेमुळे कलम 144 लागू

तिरुवनंतपुरम | केरळमधील राजकारण हे भावनिक राजकारण मानलं जातं. डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये राजकीय लढाई पहायला मिळते. अशातच केरळात भाजप आता हळूहळू हातपाय पसरताना दिसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षात राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. अशातच आता अल्झुप्पा येथे 12 तासांत दोन नेत्यांची हत्या झाल्यानंतर केरळात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि भाजप (BJP) या दोन राज्यस्तरीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे, अशी माहिती आला समोर आली आहे. रविवारी सकाळी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रणजीत श्रीनिवासन यांची त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पहायला मिळतंय. भाजप नेता सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हल्लेखोरांच्या आठ सदस्यांच्या पथकाने त्यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने वार केले. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अलाप्पुझा येथील घटनेचा निषेध केला आहे आणि सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. या घटनेनंतर आरएसएसच्या नेत्यांवर आरोप झाले होते. मात्र, आरएसएसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?”

“सगळे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसतील तर राजीनामा देईल”

“महाविकास आघाडी सरकार हरवलंय, शोधून देणाऱ्यास…”

“महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं”

“मी हरलो तर राजकारण सोडेन”, नवज्योतसिंह सिद्धूंचं खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More