पुणे महाराष्ट्र

तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले

पुणे | मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांना सोडून देण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. 

तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळून लावला होता. पुणे पोलिसांनी मुंबईतून तेलतुंबडे यांना अटक करुन पुणे न्यायालयात दुपारी तीनच्या सुमारास हजर केले. 

सरकारी वकील उज्वला पवार आणि बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांच्यातील युक्तीवादानंतर निर्णय देण्यात आला. भारिप बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेजकरही सुनावणीदरम्यान उपस्थित होते. 

दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी तेलतुंबडे यांची बेकायदेशीर अटक असून त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. 

महत्वाच्या बातम्या-

“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!

-परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच बंड

लग्नाला न आलेले ‘मनसैनिक’ अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’च्या दिशेने!

“कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले… मला पंतप्रधानपदाची आवश्यकता नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या