बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख नवी दिल्लीत दाखल, ‘या’ बड्या लोकांना भेटल्याची माहिती

नवी दिल्ली | अनिल देशमुख यांनी नुकताच राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर अनिल देशमुख यांच्या हालचालींना वेग आला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत वकिलांच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या एका याचिकेतील सुनावणीत दरम्यान महत्वाचा निर्णय सुनावला. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची सुनावणी केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयतर्फे करण्यात येईल असा निकाल दिला. यानंतर सीबीआयला येत्या 15 दिवसात अहवाल सादर करायचा आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर लवकरच कारवाईची टांगती तलवार आहे. याच प्रार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी दिल्लीत सर्वोच्च न्याययालयातील वकिल अभिषेक मनु सिंधवी यांची भेट घेतली आहे.

अभिषेक मनु सिंधवी आणि अनिल देशमुख यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर उद्या अनिल देशमुख उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत मिळत आहेत तर अनिल देशमुख आणि कपिल सिब्बल यांच्यात देखील भेट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  अॅड. जयश्री पाटील यांनी चौकशी सीबीआयला द्यावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. प्रकरण सीबीआयच्या हाती गेल्यानं अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ होण्याती शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिन वाझेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; NIA च्या ताब्यात ‘ती’ स्पोर्टस बाईक

…तर सरकारमधील अर्धा डझन मंत्री घरी जातील; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More