बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी स्टिंग ऑपरेशनचे पुरावे सादर करत विधानसभा हदरवून सोडली. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

भाजपच्या काही नेत्यांना टार्गेट केलं जातअसल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीसांनी 125 तासांच्या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हमधून सादर केला. फडणवीसांनी केलेल्या आरोपांवरून माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केल्याचा आरोप गोटे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

फोन टॅपिंगवरून व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचं गोटे म्हणाले. म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?, असा सवाल देखील अनिल गोटे (Anil Gote) यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, वकील प्रवीण चव्हाण यांनी अनिल गोटेंना फोन केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. अनिल गोटे यांनी फडणवीसांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर फडणवीसांनी हे आरोप सिद्ध करावेत, असं आव्हान देखील अनिल गोटे यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, सत्यता तपासावी लागेल”

“अजित पवार सपोर्ट करत नाहीत, पण बडे साहब सब देख रहे है”

राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी आहेत तरी कोण?, वाचा काय काय म्हणाले राऊत…

Wheather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

भाजपचं टेन्शन वाढलं! प्रियंका गांधींबाबत काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More