महाराष्ट्र मुंबई

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे- अनिल परब

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेत चांगलाच संघर्ष पेटला होता. त्यावेळी मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगणाला भाजप आणि रिपाईने पाठींबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मंत्री अनिल परब यांनी रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे.

रामदास आठवले हे अर्धशटर बंद झालेलं दुकान आहे. त्यामुळे जे उघडं आहे त्याला किती महत्व द्यायचं हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजं, असं म्हणत अनिल परब यांनी आठवलेंना टोला लगावला आहे.

कंगणा मुंबईत आली होती तेव्हा रामदास आठवलेंनी तिला विमानतळापासून ते तिच्या घराला संरक्षण दिलं होतं. जेव्हा मुंबई महापालिकेने कंगणाच्या कार्यालयावर कारवाई केली त्यानंतर आठवलेंनी कंगणाच्या घरी जात तिची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली होती.

दरम्यान, सत्ताधारी शिवसेना पक्षाने सुडबुद्धीने कंगणाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे, असं म्हटलं होतं. माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती त्या माजी नौदल अधिकाऱ्याचीही त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातील महविकासआघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवच लागू करण्याची मागणी आठवलेंनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे”

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा गेला एक लाखांच्या वर

आग्र्यातील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यावर फडणवीस म्हणाले…

“गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या