बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फायनलपुर्वी न्यूझीलंडला दुसरा मोठा धक्का; कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त

नवी दिल्ली | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. पहिल्यांदाच कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्यानं संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी पुर्णपणे तयार आहे. तर विरोधी संघ देखील त्याच जोशात सामन्यात उतरेल. मात्र, आता या अंतिम सामन्यापुर्वी न्यूझीलंडला दोन मोठे धक्के बसले आहेत.

कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फिरकीपटू मिचेल सेंटनर हे दुखापतग्रस्त झाल्यानं न्यूझीलंडच्या संघात सध्या चिंतेचं वातावरण आहे. केन विल्यमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताचा कोपर दुखावला होता. आता मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आता दुखापतीचा परिणाम आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात होण्याची शक्यता आहे.

पहिल्याच कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानं केन विल्यमसन दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. विल्यमसन सोबतच न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सेंटनर हा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अंगठ्या जवळच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किरकोळ असल्यानं तो फायनल सामना खेळण्याची शक्यता आहे. यावर संघातील प्रशिक्षकांकडुन अंतिम निर्णय घेतला जाईल

दरम्यान, गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट निवडीसाठी उपलब्ध आहे. तर मिचेल सेंटनर जखमी झाल्यानं संघाबाहेर झाला आहे. विल्यमसनच्या दुखापतीचा अंतिम निर्णय 9 जून रोजी घेतला जाईल, अशी माहिती न्यूझीलंड बोर्डाने दिली आहे. तर अंतिम सामन्यापुर्वी खुद्द कर्णधार जखमी झाल्यानं न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विल्यमसन मोठ मोठे सामने पलटवण्याची क्षमता ठेवतो, त्यामुळं भारतीय संघ देखील त्याच्या निवडीवर लक्ष ठेऊन आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यावर पसरली धुक्याची चादर, पाहा व्हिडिओ

फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More