बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!

मुंबई | शिवसेनेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोज नवे नवे हादरे बसत आहेत. अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. शिवसेनेची (shivsena) गळती अजूनही चालू आहे.

यातच आत मुंबईच्या शिवसेनेतील पहिल्या नगरसेविका शीतल म्हात्रे या थोड्याच वेळापूर्वी शिंदे गटात सामील झाल्या आहेत. शिवसेनेला आता पुन्हा मोठ खिंडार पडण्यास सुरूवात झाली आहे. म्हात्रे या दहिसरच्या वार्ड क्रमाकं 7 च्या नगरसेविका आहेत. त्या दोन वेळा नगरसेविकपदी निवडून आल्या होत्या.

शिंदे यांच्या बंडानंतर शीतल म्हात्रे यांनी आमदारांविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी आमदारांची खरडपट्टीही केली होती. काय डोंगर,काय झाडी या पाटलांच्या वाक्याचा समाचार घेतला होता, एकदा इथे या मग काय तो दांडा, काय ती पाठ दाखवतोच अशा भाषेत सुनावलं होतं. शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी त्यांचा उल्लेख शिवसेनेची अग्नीकन्या असा केला होता. त्यांच्या या निर्णयाने सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.

या निर्णयाबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या मला आता शिंदे गटाच्या हिंदुत्वावर विश्वास बसत आहे, असं शीतल म्हात्रे म्हणाल्यात.

थो़डक्यात बातम्या

भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल; महिलेने केले अत्यंत गंभीर आरोप

अभिनेता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात; लंडनमध्ये घेणार सात फेरे?

मोठी बातमी! ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा

पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं

“एवढी मोठी फाटाफूट झाली पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More