बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला आणखी एक झटका!

मुंबई | दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटात शिवसेनेच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता दसरा मेळाव्यापूर्वी आणखी काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या दसरा मेळाव्याच्या आधी हे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्येच शिंदे गट काँग्रेसला (Congress) देखील धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेसचे काही ज्येष्ठ नगरसेवकही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

शिंदे गटात शिवसेनेच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. यापूर्वी ठाणे, औरंगाबाद येथील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे

थोडक्यात बातम्या- 

‘हो मी अनेकांना चुना लावला’; एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रतन टाटांकडे दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More