कुणाची बादली होण्यापेक्षा मोदींचा चमचा होणं केव्हाही चांगलं!

नवी दिल्ली | कुणाची बादली होण्यापेक्षा नरेंद्र मोदींचा चमचा होणं केव्हाही चांगलं, असं ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. 

ज्यांना वाटतं मी नरेंद्र मोदींचं समर्थन करतो, त्यांचं गुणगान गातो. त्यांचं बरोबरच आहे, असं अनुपम खेर म्हणाले. तसेच कुणाची बादली होण्यापेक्षा नरेंद्र मोदींचा चमचा होण्यात काय वाईट आहे? असंही ते म्हणाले. 

दरम्यान, आपल्या देशात धर्माबद्दल बोलणाऱ्यांना लगेच खडसावले जाते. मात्र मी माझ्या आईने दिलेला धागा हातात बांधतो आणि मुस्लीम पीरने दिलेला तावीजही बांधतो. हीच खरी भारताची ओळख आहे, असं ते म्हणाले.