बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 वर्षांवरील सर्वांनाच बुस्टर डोस देण्याबाबत ‘या’ सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

नवी दिल्ली | भारतात लसीकरणाने वेग घेतला असून आता तिसरा म्हणजेच बुस्टर डोस देण्यासंबंधी विचार सुरु आहे. असं असताना तिकडे अमेरिकेत मात्र 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुस्टर डोस देण्यास मान्यता मिळाली आहे. फायझर आणि मॉडर्ना या व्हॅक्सिन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेत लवकरच बुस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे.

अमेरिकन सरकारची 20 सप्टेंबरपासूनच बुस्टर डोसला मान्यता देण्याची योजना होती. मात्र एफडीएमधील संशोधकांनी या बुस्टर डोसमधील त्रुटी दाखवून देत त्याला नकार दिला होता. दोन दिवसांपूर्वी मॉर्डनाने बुस्टर डोसला मान्यता देण्यासाठीचे निवेदन दिले होते. यावेळी एफडीएचे कार्यवाहक आयुक्त जेनेट वुडकॉक यांनी बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली आहे. कंपनीने आजच याबाबत घोषणा केली आहे.

आता थंडी सुरु होत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील कमी आढळते. त्यावर उपाय म्हणून बुस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना आजारी पडण्याआधीच जर बुस्टर डोस दिले. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही, असं अमेरिकन सरकारचं गणित आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भारतातही कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची भीती पुन्हा उद्भवू नये, यासाठी नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांना बुस्टर डोस देण्यासंदर्भात कोरोना टास्क फोर्स आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र आता लवकरच बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचं कोरोना टास्क फोर्सकडून सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More