मुंबई | राज्यात एनसीबीनं कारवाई केलेल्या कथित क्रुझ ड्रग्ज प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलीस अटक करतील अशी शक्यता होती. यानंतर समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी वानखेडेंवर अजूनही अटकेची टांगती तलवार कायम असल्याचं पहायला मिळत आहे.
समीर वानखेडेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना मदतीसाठी पत्र लिहीलं होतं. तपास सुरू असला तरी माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी वानखेडेंनी केली होती.
आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत मुंबई पोलिसांच्या वतीनं पक्षपात आणि अन्याय होण्याची शक्यता असल्यानं सीबीआय नाहीतर एनआयएनं आपली चौकशी करावी, अशी मागणी समीर वानखेडेंनी केली आहे. यावर आता समीर वानखेडे यांना तीन दिवसांची नोटीस दिल्याशिवाय अटक करणार नाही, अशी हमीही मुंबई पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. मात्र अजूनही त्यांची अटकेची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राज्यात मागील काही आठवड्यांपासून मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विविध गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंनी मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळत चाललं असून असून पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”
‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय
“लाडक्या आर्यनला बेल मिळाला, आता जनतेच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेणार का?”
एकनाथ शिंदे यांना कुटूंबासह जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर
Comments are closed.