बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धटपणा भोवला! राणू मंडलवर पुन्हा आली रस्त्यावर गाण्याची वेळ, पाहा ‘हा’ व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियामुळे एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली राणू मंडल एक दिवस अचानकपणे गायब झाली. एका गाण्याच्या व्हिडीओनं तिला रात्रीत स्टार बनवलं होतं. या व्हिडीओनं राणू मंडलचं आयुष्य पुर्णपणे बदलून गेलं. मात्र तिच्या उद्धटपणामुळे तिला आलेल्या चांगल्या दिवसांनाही मुकावं लागलं आहे.

‘एक प्यार का नगमा है’ गाण्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे राणू मंडलला बॉलिवूडमध्ये गाणं गाण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं राणू मंडलला गाणं गाण्याची संधी दिली. एक सेलिब्रेटी म्हणून तिचा वावर होई लागला. अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. मात्र तिच्या उद्धटपणामुळे, उर्मटपणामुळे तिला हे सगळं गमवावं लागलं. त्यामुळे रातोरात स्टार झालेल्या राणू मंडलला आता पूर्वीचे दिवस पहायला लागत असल्याचं दिसत आहे.

राणूच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिची परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होती तशीच झाली आहे. ती पुन्हा रस्त्यावर गाणं गाताना दिसत आहे. यावेळी ती ‘भुलेगा दिल जिस दिन तुम्हे’ हे गाणं गाताना दिसून आली. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

दरम्यान, राणू मंडलच्या गाण्यामुळे काही दिवसातच तिचे अनेक चाहतेही बनून गेले. त्यामुळे तिचा मीडियाशी देखील संपर्क वाढू लागला. तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत असे, परंतु तिला हे सर्व हाताळता आलं नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधींना उलट उत्तरं देणं या सर्वामुळं तिचे जुने दिवस परत आले आहेत. या अशा उद्धट वागण्यानं राणू मंडलला आता पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

 

थोडक्यात बातम्या – 

Good Morning अण्णा! व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

उद्यापासून राज्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

“भाजपचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी सरकार वाहून जाईल”

शिक्षक भरतीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुलाखतीद्वारे भरणार तब्बल ‘इतक्या’ जागा

प्रविण कुमारची दमदार कामगिरी! अवघ्या 18 व्या वर्षी पटकावलं रौप्यपदक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More