महाराष्ट्र मुंबई

“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”

मुंबई | नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अमित शहांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

वचन दिलं होतं की नाही, हे सांगायला शहा यांना सव्वा वर्ष लागलं. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला सावंत यांनी अमित शहांना लगावला आहे.

ठाकरे कुटुंब नेहमीच खरं बोलतं. त्यावेळेस जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात 50-50चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शहांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सर्व राज्यात फोडाफोडीचं राजकारण करत आहे. सत्तेसाठी ते काहीही करतात, अशी टीका सावंतांनी भाजपवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मृत्यूच्या दाढेतून त्याला जवानांनी सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हीडिओ

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार

अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

…म्हणून उद्घाटनाला अमित शहांना बोलावलं- नारायण राणे

मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या